पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांसाठी जिल्ह्यात ५७२ उमेदवारांनी दिली परीक्षा

 

पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील

४१ संवर्गातील ३७७ पदांसाठी जिल्ह्यात ५७२ उमेदवारांनी दिली परीक्षा

लातूर दि. 12 (जिमाका) : पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट "अ" ते गट "ड" मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एकुण ५५ हजार २१४ एवढे उमेदवार परीक्षा देत आहेत. सदरची परीक्षा टि.सी.एस कंपनीमार्फत घेण्यात येत आहे.

दि.११ डिसेंबर, २०२३ रोजी लातूर येथील कॉस इस्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, गुरु ऑनलाईन एक्याम सेंटर, ओमसाई इन्फोटेक, संदिपानी टेक्निकल कॅम्पस व स्वामी विवेकानंद टेक्निकल इस्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक या परीक्षा केंद्रावर दोन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिले सत्र सकाळी              ९ ते ११ व दुसरे सत्र दुपारी १ ते ३ अशा वेळेत परीक्षा पार पडली, या परीक्षेमध्ये एकूण ५७२ एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता.



परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपिक व एक शिपाई नियुक्त करण्यात आला होता. तसेच परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता या केंद्रा वर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये याबाबत योग्य ती दक्षता घेण्यासाठी, शासन मान्यता प्राप्त कंपनीची प्रत्येक परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आलेले होते.

परीक्षेसाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली. त्यास पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही, असे नगरपरिषद प्रशासन विभागाचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे यांनी कळविले आहे.

                                                             ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित