रेणापूर तालुक्यातील मद्यविक्री 22 डिसेंबर रोजी राहणार बंद

 रेणापूर तालुक्यातील मद्यविक्री 22 डिसेंबर रोजी राहणार बंद


लातूर, दि.21 (जिमाका) : संपूर्ण रेणापूर तालुक्यातील सर्व देशी, विदेशी मद्याचे बार, परमिट रूम, दुकाने, अबकारी अनुज्ञप्त्या 22 डिसेंबर 2023 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.

मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेल्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर मुंबई दारूबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत