एड्स जनजागरण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 एड्स जनजागरण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद




लातूर
दि. 01 (जिमाका) : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयलातूरच्या वतीने 1 डिसेंबर2023 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त काढण्यात आलेल्या एड्स जनजागरण रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

आरोग्य सेवाचे उपसंचालक डॉ. अर्चना भोसलेविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉ. समीर जोशीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेलेइनरव्हील क्लबच्या श्रीमती मेघा आग्रोयानिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडाविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधवजिल्हा कार्यक्रम अधिकारी विपीन बोर्डे यांच्यासह लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि आरोग्य विभागातील अधिकारी  व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

‘समाजाचा पुढाकार एचआयव्ही, एड्सचा समूळ नाश’चा नारा देत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून निघालेली जनजागरण रॅली मिनी मार्केटगांधी चौकहनुमान चौकगुळ मार्केट मार्गे गांधी चौक, टाऊन हॉल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी एचआयव्ही, एड्सबाबत शास्त्रोक्त माहिती देण्यात आली.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी रॅलीतील उपस्थितांना एचआयव्ही आणि एड्सचा प्रतिबंध व प्रतिकार करणे, तसेच एचआयव्ही तथा एड्सचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य सेवाचे उपसंचालक डॉ.  भोसलेअधिष्ठाता डॉ. जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रॅलीमध्ये सोनी नर्सिंग स्कुलस्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगन्यु व्हिजन नर्सिंग स्कूलवेदांत नर्सिंग कॉलेजशासकीय नर्सिंग कॉलेजबाभळगाववि.दे. शा.वै. म. नर्सिंग कॉलेजइंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजश्री भगवान नर्सिंग स्कुलमहात्मा बसवेश्वर महाविद्यालयमहाराष्ट्र स्कुल अॅन्ड कॉलेज ऑफ नर्सिंगटीआय प्रकल्पविहान संस्था तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

एचआयव्हीबाधित मातेकडून बाळाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी नियमित औषधीउपचारतपासणी व नियमित पाठपुरावाअंती 27 बालेक एचआयव्ही निगेटिव्ह झाली आहेत, हे या कार्यक्रमाचे मोठे यश असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत