चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील 33 बेवारस वाहनांबाबत आवाहन

 

चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील 33 बेवारस वाहनांबाबत आवाहन

 

लातूर, दि. 19 (जिमाका) :  चाकूर पोलीस स्टेशन हद्दीमधील बेवारस वाहन व अपघातातील 33 वाहनांविषयी संबंधित वाहन मालकांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 82 प्रमाणे कार्यवाही करून दोन महिन्याच्या आज कायदेशीर मालकी संबंधाचे कागदपत्रासह चाकूर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. 

विहीत मुदतीमध्ये कोणाचाही मालकी हक्क सिध्द न झाल्यास कोणाचीही कोहीही तक्रार नाही, असे गृहीत धरुन पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे चाकूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

****  

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत