Posts

शासकीय वसतिगृह प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

शासकीय वसतिगृह प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ २८ नोव्हेंबरपर्यंत स्पॉट ॲडमिशनसाठी नोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक लातूर, दि. २० (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत स्पॉट ॲडमिशनसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज पूर्ण करणे बंधनकारक आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी दिली. लातूर जिल्ह्यात मुलांची १४ आणि मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मागील शैक्षणिक वर्षातील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी गृहपाल आणि सहायक आयुक्त यांच्या लॉगिनमध्ये 'स्पॉट ॲडमिशन' हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइ...

माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी • पाणी व चारा टंचाई, रोजगाराबाबत शेतकऱ्यांशी संवाद

Image
माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी • पाणी व चारा टंचाई, रोजगाराबाबत शेतकऱ्यांशी संवाद लातूर, दि. १९ : माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, तसेच नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पांदण रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा व रोजगाराविषयी माहिती घेतली. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नायगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना माननीय राज्यपाल म्हणाले की, यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आह...

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांचा माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आढावा

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांचा माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आढावा लातूर, दि. १९ : राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये ही बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, पाणीटंचाई निवारण, चारा नियोजन, पीक नुकसान भरपाई आदी बाबींच्या माहितीचे यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील ऋतुचक्र लक्षात घेवून जिल्ह्यात भूजल पुनर्भरणासाठी मोहीम स्वरूपात रिचार्ज शाफ्टसारखी कामे हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच पीक पद्धतीतही अनुरूप बदलासाठी शेतकऱ्यांना प्रोत्...

लातूर आरटीओ कार्यालयाकडून परिवहनोत्तर संवर्गातील वाहनांसाठी ‘MH24-CJ’ नवीन मालिका सुरू

लातूर आरटीओ कार्यालयाकडून परिवहनोत्तर संवर्गातील वाहनांसाठी ‘MH24-CJ’ नवीन मालिका सुरू • आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज प्रक्रिया लातूर, दि. १७ : परिवहनोत्तर संवर्गातील (Non-Transport 2W) वाहनांकरिता ‘MH24-CJ’ ही नवीन मालिका सुरू करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या नवीन मालिकेतील आकर्षक किंवा पसंतीचे क्रमांक राखीव ठेवण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोटर कार व मालवाहु वाहन (दुचाकी वगळून) तसेच १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुचाकी वाहनासाठी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत अर्ज व विहित शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश (DD) 'RTO LATUR' या नावाने स्वीकारण्यात येत आहेत. एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, त्या आकर्षक क्रमांकाचा लिलाव २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता सह प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षामध्ये केला जाईल. सदर लिलावात संबंधित अर्जदाराने वाढीव रकमेचा धनादेश (DD) सादर करणे बंधनकारक राहणार असून, ज्या अर्जदाराने जास्तीचा वाढीव रकमेचा धनादेश सादर केला जाईल, त्या अर्जदारास तो आकर्षक पसंती क्रमांक राखीव ठेवण्यात येईल याची...

सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींसाठी 'सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम' राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन सारथी विभागीय कार्यालय उपव्यवस्थापकीय संचालक व उपजिल्हाधिकारी श्रीमती आम्रपाली कासोदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली असून, संस्थेमार्फत विविध कल्याणकार...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. १७ : अनुसूचित जाती व नवबुद्ध समाजाच्या घटकांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यास ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक बीएसीएच-२०१६/प्र.क्र.२९३/शिक्षण-२, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२, दिनांक २६/१२/२०२४ अन्वये या योजनेत सुधारणा करण्यात आली असून, ही योजना २०१७ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेकरिता शासन निर्णयातील नमूद अटी व शर्तींच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या महा-आयटी पोर्टलवर सन २०२६-२७ मधील ‘सेंन्ट बॅक’ अर्जांना त्रुटीपूर्ता करण्यासाठी विद्यार्थी लॉगिनवर (सेंन्ट बॅक) पाठविण्यात आले आहेत. अर्जांची त्रुटीपूर्ता करण्यासाठी महा-आ...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी लातूर, दि. 17 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 23 डिसेंबर, 2026 या कालावधीत 'एसएसबी कोर्स क्र. 68' आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा दिली जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 8 डिसेंबर, 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरून किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून एसएसबी-68 कोर्सचे प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्णपणे भरून सोबत आणणे आवश्यक ...