लातूर जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा संधी; ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार गणना प्रपत्र
लातूर जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा संधी;
३० नोव्हेंबरपर्यंत सादर करता येणार गणना प्रपत्र
२२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी
लातूर, दि. २० : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)-२०२६ अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत २ लाख १४ हजार ४४२ मतदारांच्या नावसमोर अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (एएसडीडी) अशी नोंद करण्यात आली आहे. संबंधित मतदारांना त्यांचा पूर्वीचा मतदार ओळखपत्र क्रमांक वापरून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा 'ECINET' ॲपद्वारे गणना प्रपत्र डाऊनलोड करून सादर करता येईल. पूर्वीच्या पत्त्यावर वास्तव्यास असलेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-ब मधील निवेदन, तर राज्यांतर्गत स्थलांतरित मतदारांनी नवीन पत्त्याची तपशील व पुराव्यासह परिशिष्ट-क मधील निवेदन सादर करावे. अशा स्थलांतरित मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-८ सादर करण्याची आवश्यकता नाही.
संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांशी संपर्क साधून गणना प्रपत्र प्रत्यक्ष अथवा व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे उपलब्ध करून देतील. तसेच 'बुक ए कॉल विथ बीएलओ' या सुविधेद्वारे मतदारांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. एसआयआर प्रक्रियेदरम्यान नमुना-६ सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत बास्टेोवाड यांनी केले आहे.
अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (एएसडीडी) नोंदीचा तपशील
अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (एएसडीडी) नोंदीचा तपशील
विधानसभा मतदारसंघ मृत अनुपस्थित स्थलांतरीत इतर दुबार एकूण
लातूर ग्रामीण 9811 1390 20214 106 2971 34492
लातूर शहर 12232 6448 20799 70 6113 45662
अहमदपूर 6455 3901 19808 58 3923 34145
उदगीर 7011 3089 19892 57 3471 33520
निलंगा 8542 1328 22530 58 4830 37288
औसा 7694 2457 14969 121 4094 29335
एकूण 51745 18613 118212 470 25402 214442
*****
Comments
Post a Comment