जिल्ह्यातील डाळिंब,लिंबू व सीताफळ पिकासाठी विमा योजना लागू
जिल्ह्यातील डाळिंब , लिंबू व सीताफळ पिकासाठी विमा योजना ला गू *लातूर,दि.31(जिमाका):-* मृग बहार -20 22 मध्ये डाळिंब , लिंबू व सीताफळ या पिकासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्हृयामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे .असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल . जिल्हृयामध्ये सदर योजना एच . डी . एफ . सी . अर्गो जनरल इन्शूरन्सं कपंनी मुंबई या विमा कंपनीमार्फत कार्यान्वीत केली जात आहे . ...