धोंडीराम शंकर कारले यांची मुलगी हरवली आहे कोणास आढळल्यास वाढवणा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

धोंडीराम शंकर कारले  यांची मुलगी हरवली आहे

कोणास आढळल्यास वाढवणा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

 

*लातूर,दि.31 (जिमाका):-* फिर्यादी नामे धोंडीराम शंकर कारले वय 43 वर्षे व्यवसाय मजुरी रा.गोताळा ता. अहमदपूर जि. लातूर यांनी दिनांक 24 जून 2021 रोजी पो.स्टे. वाढवणा येथे फिर्याद जबाब दिला की, त्यांची मुलगी वय 16 वर्षे 2 महिने हि दिनांक 22 जून 2021 रोजी मध्य रात्री 02.00 वा. सुमारास ही लघवीला जावून येते म्हणून झोपलेल्या ठिकाणाहून गेली ती परत आली नसल्याने तिचा घरी व गावात शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही तरी माझे मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणासाठी पळवून घेवून गेले वगैरे वरुन पो.स्टे. वाढवणा येथे गुरनं 104/2021 कलम 363 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास चालू आहे असे पोलीस उपनिरीक्षक वाढवणा, एम.के.गायकवाड  यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

सदर गुन्हयातील पिडीत मुलीचे वर्णन पूढील प्रमाणे आहे. वय 16 वर्षे 2 महिने, उंची- 5 फुट, रंग- सावळा, नाक –सरळ, अंगात- लाल रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, शरीर- सडपातळ, चेहरा- लांबट, केस- लांब वेणी या वर्णनाची मुलगी कोणास आढळल्यास सहा. पोलीस निरीक्षक पो. स्टे. वाढवणा ता.उदगीर जिल्हा लातूर मो.न. 9699155927 यांच्याशी संपर्क साधावा.

 

                                              000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा