*मान्सून-2022 पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न* *आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून* *संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणानी सज्ज रहावे* *-अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे*

 

*मान्सून-2022 पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न*

*आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून*  

*संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणानी सज्ज रहावे*
                                                 
*-अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे*


*
लातूर,(जिमाक)दि.19:-* आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी आपल्या यंत्रणा सुसज्ज ठेवून आपत्कालीन परिस्थितीत सतर्क रहावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिल्या.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.पी.डी.सी. सभागृहात मान्सुन पूर्वतयारी बैठकीत मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी लोखंडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विद्यान संस्था लातूर डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, कार्यकारी अभियंता, रोहित जगताप, एम.एम. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

त्याचबरोबर सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर पालिका / नगर पंचायत यांच्यासह सर्व संबंधित जिल्हा विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना आवश्यक मान्सून पूर्वतयारी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह नदी काठावरील परिसरातील गावांची पाहणी करुन नदीच्या पुर पातळीजवळील वस्त्यांचे स्थलांतर करावे. लघुपाटबंधारे विभागाने पाणीसाठा, क्षमता याची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करुन नोडल अधिकारी नेमावेत. तसेच पूर पातळीची ब्ल्युलाईन आणि रेडलाईन निश्चित करण्यासासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील मोठे धरण, पाझर आणि साठवण तलावाची पाहणी करुन देखभाल दुरुस्ती तात्काळ करुन त्याठिकाणी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. ज्या गावांचा पुरामुळे संपर्क तुटण्याची शक्यता आहे अशा गावांचा सर्व्हे करुन पुरवठा विभागाने अन्न, औषध आणि पेट्रोल साठा वेळेवर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची पाहणी करुन पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करावीत. आपत्का लीन परिस्थितीत झाडे मोडून रस्त्यावर पडणे, पुरामुळे रस्ते फुटणे, रस्ते अपघात इत्यादी वाहतूक व्यवस्थेत निर्माण झालेला अडथळा दूर करुन वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी जेसीबी, पोकलेन, डंपर इ. साहित्य तात्काळ उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने संसर्गजन्य आणि साथीच्या रोग नियंत्रणासाठी तयारी करुन गावातील आरोग्य केंद्रात आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करुन द्यावा, आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावे. सर्प दंश आणि विंचू दंशावर प्रभावी औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मागील तीन वर्षात कोणत्या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा प्रार्दूभाव झाला होता, त्यानुसार त्या-त्या गावामध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे. आपत्तकालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करण्याचे नियोजन देखील आरोग्य विभागाने करावे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांकरीता रोगप्रतिकारक लसी उपलब्ध करुन ठेवाव्यात. 

महानगरपालिका व नगरपरिषद यांनी त्यांच्या हद्दीतील गटार व्यवस्था, नालेसफाई, नाल्यातील गाळ काढणे, दुरुस्ती करणे, मलःनिस्सारण करणे गटारीची व्यवस्था, झोपडपट्टीतील पाण्याचा निचरा करणे आदीची मान्सुन पुर्वतयारीची कामे तात्काळ प्राधान्याने पुर्ण करावीत. मनपा, नगर परिषद आणि ग्रामपंचायत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील धोकादायक जुने वाडे, बुरुज आणि इमारतीची पाहणी करुन संबंधितास तात्काळ नोटीस द्यावी. तसेच माळीण सारखी घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील टेकडी किंवा डोंगराखालील गावे किंवा वाड्यांची पाहणी करावी. तसेच दि. 25 मे, 2022 पासून 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. 
पोलीस वाहतूक व नियंत्रण व रस्तेू महामार्ग यांनी जिल्ह्यातील प्रमुख रस्ते महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी सुचना फलक उभारण्यात यावेत. अपघात झालेल्या व पुरामुळे किंवा झाड पडीमुळे रस्ता बंद पडलेल्या ठिकाणी तात्पुरती मार्ग बदलून व्यवस्था निर्माण करणे व वाहने हळूवार चालविण्याबद्दल तसेच वाहतूकीच सर्व नियम पाळण्याच्या वाहनचालकांना सूचना देण्यात याव्यात.

महावितरण विभागाने धोकादायक पोल, ट्रान्सफार्मर, विद्युत वाहिन्या, लाईन्सवरील मोठया झाडांच्या फांद्याचा अडथळा दुर करणे, नविन पोल टाकणे इ. कामे पावसाळा सुरु होण्यापुर्वी पुर्ण करावीत. सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात यावेत. आपत्तीच्या काळात तात्काळ कर्मचारी उपलब्ध हाईल याची दक्षता घ्यावी. सर्व गावातील डी.पी ची पाहणी करुन फ्यूज बॉक्सची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करुन घ्यावी. महावितरणच्या अधिकारी यांनी वादळ व पुरामुळे विद्युत प्रवाह पाण्यात उतरून जिवीत हानी होऊ नये तसेच वादळामुळे पोल पडून विद्युत प्रवाह पाण्यात उतरून वित्त व जिवीत हानी होऊ नये यासाठी वादळी वारे व पाऊस चालू होताच विद्युत पुरवठा खंडीत करून वादळी वारे व पाऊस थांबताच विद्युत पुरवठा चालू करण्याची दक्षता घ्यावी.

शिक्षणाधिकारी (मा) व (प्रा) यांनी पावसाळ्यापूर्वी शाळांची दूरुस्ती करावी. तसेच शालेय सुरक्षा समिती स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा. मंडळे, लघुपाटबंधारे विभाग आणि हवामानावर अधारित पीक विमा योजनेचा लाभ देणारी कंपनी यांच्या रेनगेजची आकडेवारी दैनंदिन घेण्याचे नियोजन करावे. तसेच सर्व उपविभागीय आणि तालूकास्तरावरील सर्व संबंधित विभागांनी कुलाबा वेध शाळा मुंबई येथून अतिवृष्टी बाबत इशारा मिळल्यापस जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागाना / नदीकाठच्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी / ग्रामसेवक यांना तात्कासळ देण्यात यावा. आपल्या कार्यालयात 24 तास स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करुन नोडल अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांनी नेमणूक करावी. तसेच त्यांचे संपर्क क्रमांक आणि उपलब्ध साहित्य सामुग्री, वाहनांची माहिती ही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी. मान्सून काळात वीज पडून जीवितहानी होण्याच्या दुर्घटना होण्याचे प्रमाण मोठे असून, अशा घटना टाळून प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे. आपत्कालीन कक्ष स्थापन करुन आवश्यक तेथे वेळेवर मदत पोहचण्याकरीता प्रयत्न करावे. जिल्हाह आपत्ती व्यनवस्थातपन अधिकारी आपत्काथलीन टोल फ्री नंबर 1077 कार्यन्वित ठेवण्यात यावा. तसेच आपत्तकालीन परिस्थितीमध्ये कामात हलगर्जीपण केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल अशा ही सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. 

आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने कामे करावे अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी यावेळी दिल्या. बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेबउस्मानी यांनी सादरीकरनाद्वारे सविस्तर माहिती दिली. भारतीय हवामान खात्याच्या पहिल्या अहवालानुसार यंदा वार्षिक सरासरीच्या शंभर टक्के पास पडेल असा अंदाज व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, नगर परिषदाचे मुख्य अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची उपस्थिती होती.

****  

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु