जिल्ह्यात आज रमजान ईदनिमित्त मद्य विक्री बंद
जिल्ह्यात आज
रमजान ईदनिमित्त मद्य विक्री बंद
*लातूर, दि.2(जिमाका):-* जिल्ह्यात दिनांक 3
मे 2022 रोजी रमजान ईद उत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असल्याने या कालावधीत कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मुंबई मद्य
निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 3
मे 2022 रोजी (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार) रमजान ईद उत्सव निमित्त सर्व
किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत: बंद राहतील असे आदेश जारी
केले आहेत.
या आदेशाची लातूर
जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर
आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा
1949 व अनुषांगिक नियमांधारे कडक कारवाई करण्यात येईल याची नांद घ्यावी. असे ही
आदेशात नमुद केले आहे.
000
Comments
Post a Comment