लातूर जिल्हा क्रीडा संकुल समितीचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा जिल्हा क्रीडा संकुल दुरुस्तीबरोबर स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी योग्य ते नियोजन करावे -पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 

लातूर जिल्हा क्रीडा संकुल समितीचा

पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा 


जिल्हा क्रीडा संकुल दुरुस्तीबरोबर

स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी योग्य ते नियोजन करावे

-पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश 

 

§  विभागीय क्रीडा संकुलासाठी आंतरराष्ट्रीय मानांकन लक्षात घेऊन जागा   निवडावी

 


लातूर, दि.16:- (जिमाका):- जिल्हा क्रीडा संकुल दुरुस्तीबरोबर स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी योग्य ते नियोजन करावे तसेच विभागीय क्रीडा संकुलासाठी आंतरराष्ट्रीय मानांकन लक्षात घेऊन जागा निवडावी असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

 लातूर विभागीय आणि जिल्हा क्रीडा संकुल समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.


या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे, उपअभियंता रोहन जाधव, जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रिडा अधिकारी दत्ता गडपल्लेवार, कृष्णा केंद्रे त्याबरोबर इतर शासकीय सदस्य आदी संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.


पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरच्या क्रीडा सुविधांच्या खर्चाचा व देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचा, दि. २३ मार्च २०२२ शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामास झालेल्या निधी वाढीनुसार संकुलात असलेल्या सुविधाचे नुतनीकरण करणे, अद्यावतीकरण करणे व नव्याने उभारणे याबाबत अंदाजपत्रक आराखडे तयार करून शासनास पाठविणेकरीता चर्चा करून निर्णय घेणे, वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे/मुदतवाढ देणेबाबत, दि. 31 ऑगस्ट, 2020 शासन निर्णयानुसार क्रीडा संकुल समिती रचनेनुसार सदस्य नियुक्ती करणेबाबत चर्चा करून निर्णय घेणेबाबत, जिल्हा संकुलातील व्यापारी गाळे / हॉल भाडेतत्वावर कराराद्वारे देणेबाबत, जिल्हा क्रिडा संकुलातील सुविधाकरीता विद्युत, प्लंबीग , रंगरंगोटी दुरुस्ती व इतर अत्यावश्यक मान्यता देणे या विषयांचा आढावा घेतला.


यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून खेळाडूंना दर्जात्मक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बॉस्केटबॉल, कुस्ती , क्रीकेट या खेळांसाठी मैदानाचा अभ्यास करावा. तसेच वसतिगृहासाठी आताच्या व नवीन आर्किटेक्टची माहिती घेऊन प्रोफाइल तयार करून आमच्याकडे पाठवावी.

कव्हा येथील क्रीडा मैदाना भोवतीच्या भिंतीचे काम दर्जेदार झालेले नाही, त्या भिंती आतापासूनच वाकलेल्या आहेत. त्या कामाचा त्रयस्थ यंत्रणेकडून दर्जा तपासून घ्यावा असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले.

कव्हा येथील जागेत विविध क्रीडा प्रबोधिनी सुरु कराव्यात , अजून कोणत्या खेळाचे मैदान करता येईल आणि त्यासाठीचा निधी कसा मिळेल तेही पहावे अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

विभागीय क्रीडा संकुलासाठी योग्य जागा शोधावी

एकाच मैदानात सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय मानांकन राखून खेळ होतील अशी जागा विभागीय मैदानासाठी असावी, तशी जागा मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

          क्रीडा विभागाने या बैठकीत सादर केलेल्या जिल्हा क्रिडा संकुलातील ड्रेनेज सिस्टीम, बॉस्केटबॉल मैदानाचे अद्यावतीकरण, लॉन टेनिस  भिंत बांधणे, 400 मीटर धावण्याच्या मार्गाची दुरुस्ती, आतील व बाहेरील मैदान पोयटा माती टाकून सपाटीकरण करणे, जिल्हा क्रिडा संकुलातील विविध इमारतीची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे व आवश्यकतेनुसार नवीन स्वच्छतागृह  बांधकाम करणे,जिल्हा क्रिडा संकुलातील स्ट्रीट लाईट, विविध क्रीडा डा सुविधामधील विद्युत व्यवस्था आढावा घेऊन आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात वॉटर प्रुफिंग व रंगरंगोटी करणे किरकोळ दुरुस्ती करणे तसेच स्वच्छता गृह तयार करणे या उपयुक्त सुविधा अगोदर उपलब्ध कराव्यात अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या.रिक्त झालेल्या पदासाठी सेवानिवृत्त कर्मचारी याना कंत्राटी नेमणूक करण्याबाबत सूचना केल्या.

मा. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून क्रीडा संकुलाची कामे करावीत, न्यायालयाला कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी द्यावा अशाही सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केल्या.

या बैठकीत क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी क्रिडा कार्यालयात भरलेली पदे व रिक्त पदांची यावेळी माहिती दिली.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा