महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांचा दौरा ▪महिलांविषयक प्रकरणांचा घेणार आढावा*
*महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांचा
दौरा*
▪*महिलांविषयक प्रकरणांचा घेणार आढावा*
दि. 25 मे,
2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्ह्यातील महिलाविषयक
प्रकरणाचा त्या आढावा घेणार असून यात निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रुम जिल्ह्यात
विविध विभागातर्फे महिलांविषयक राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती घेणार आहेत.
विविध सेवा बजावताना महिलांसाठी अत्यावश्यक असलेल्या स्वतंत्र कक्ष व त्यातील मूलभूत
सुविधा आदि विविध कार्यालयांना भेट देवून त्या वस्तूस्थिती समजून घेणार आहेत.
महिलांच्या
सुरक्षिततेसाठी शासनाने विविध योजना हाती घेतलेल्या आहेत. आपले कार्यालयीन कर्तव्य
बजावताना महिलांना स्वतंत्र चेंजींग रुम्स, हिरकणी कक्ष, एस. टी. स्टँडवरील महिलांची
सुरक्षितता व स्वच्छालय याबाबत त्या आढावा घेणार आहेत.
****
Comments
Post a Comment