आरोग्य विभागाची सतर्कता ; निलंगा तालूक्‍यातील मौजे केदारपूर अन्नविषबाधा, सर्वांवर तात्काळ उपचार

 

आरोग्य विभागाची सतर्कता ; निलंगा तालूक्‍यातील मौजे केदारपूर अन्नविषबाधा,

सर्वांवर तात्काळ उपचार

 


लातूर,दि.23,(जिमाका):- निलंगा तालूक्‍यातील मौजे केदारपूर या गावातील दि.२२ मे, २०२२ रोजीच्‍या लग्‍नसमारंभात जेवण केल्‍यानंतर गावक-यांना अन्‍नविषबाधा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.

या लग्‍नासाठी मौजे जवळगा ता.देवणी येथील वऱ्हाडी उपस्थित होते. गावकऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार साधारण १ हजार लोकांचा स्‍वयंपाक तयार करण्‍यात आला होता. स्‍वयंपाकात बटाटा, टमाटे व गोबीची मिक्‍स भाजी, वरण, भात, चपाती, खारी बुंदी व गोड बुंदी असे पदार्थ होते. त्‍यापैकी भाजी, वरण बनवण्‍याची पुर्व तयारी २१ मे च्‍या मध्‍यरात्रीपासून सुरू करण्‍यात आलेली होती. गोड बुंदी मध्‍यरात्री बनवण्‍यात आलेली होती. २२ मे रोजी साधारण दुपारी १ वाजण्‍याच्‍या सुमारास लग्‍न लागल्‍यानंतर लोकांनी जेवण केले.


लग्‍नात जेवण केल्‍यानंतर रात्री केदारपुर येथील लोकांना मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्‍याने ७३ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबुलगा येथे उपचारासाठी दाखल झाल्‍यानंतर संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी सदर गावात पथक पाठविले केदारपूर येथील आरोग्‍य पथकास गावात १०५ लोकांना सदर लक्षणे आढळून आले. तसेच काटे जवळगा या गावातील २५ लोकांना सदरचा त्रास जाणवला. अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत या दोन्‍ही गावात मिळून एकूण २०३ रुग्ण आढळून आले. सर्व रूग्‍णांवर तातडीने उपचारात्‍मक कार्यवाही करण्‍यात आल्‍याने सर्व रूग्‍णांची तब्येत आता स्थिर व चांगली आहे.


तसेच, मौजे जवळगा ता.देवणी येथील वऱ्हाडीपैकी एकूण १३३ लोकांना सदरचा त्रास जाणवल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यापैकी २० रूग्‍णांनी वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचार घेतले व ११३ रूग्‍णांनी जवळगा या गावातील आरोग्‍य पथकामार्फत उपचार घेतले.

तसेच, उपजिल्‍हा रूग्‍णालय, निलंगा येथे ११ रूग्ण उपचारासाठी दाखल झालेले होते. प्राथमिक माहितीनुसार मौजे केदारपूर १७८, काटे जवळगा २५ व मौजे जवळगा १३३ असे तीनही


गावात मिळूण एकूण ३३६ रूग्‍णांना अन्‍नविषबाधा झाल्‍याचे आढळुन आले. रूग्‍णांना वेळेत उपचार मिळाल्‍याने बरे झाल्‍यानंतर त्‍यांना डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे. सद्यस्थितीत तीनही गावातील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे.

सदरील, तिनही गावात २४ तास वैद्यकीय पथक मुबलक औषधी साठ्यासह तयार ठेवण्‍यात आले असून त्‍यांना सतर्क राहण्‍याबाबत सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. आरोग्‍य विभागाच्‍या जिल्‍हास्‍तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने (RRT) सदर ठिकाणी प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली असता पुढील उपचारात्मक व प्रतिबंधांत्‍मक उपाययोजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे निर्जंतुकीकरण, परिसर स्‍वच्छता, आशांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करणे इत्‍यादी महत्‍वाच्‍या सुचना दिलेल्‍या आहेत.तसेच आरोग्‍य शिक्षणावर भर देण्‍यास सांगण्‍यात आले आहे. 

*****





Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु