वस्तू व सेवाकर खात्याची सुवर्ण “अभय योजना-2022” चा लाभ घ्यावा

 

वस्तू व सेवाकर खात्याची

सुवर्ण अभय योजना-2022चा लाभ घ्यावा

 

        *लातूर,दि.6 (जिमाका):- * प्रत्येक आर्थिक वर्षासाठी रु. 10 लाख पर्यंतच्या थकबाकीसाठी एकत्रित (Lumsump) 20 टक्के रक्कम भरुन उर्वरीत 80 टक्के रक्कम माफीचा लाभ घेता येईल. तसेच प्रत्येक आर्थिक वर्षासाठी रु. 10 लाखावरील व रु. 50 लाखपर्यंतच्या प्रलंबित थकबाकीसाठी, अभय योजना -2022 च्या परीपत्रकानुसार पात्र रक्कम (Requisite amount ) भरना करुन लाभ घेता येईल. रु. 50 लाख व त्यावरील थकबाकीदारांसाठी या योजनेनुसार हप्तेबंदीची सुविधा उपलब्ध्‍ आहे. तरी जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यकर उपआयुक्त सौ. रंजना देशमुख यांनी केले आहे.

        सर्व विक्रीकर थकबाकी व्यापारी बांधवासाठी महाराष्ट्र शासनाने विक्रीकर व इतर 11 कायद्याअंतर्गत दि. 30 जून 2017 पर्यंतच्या प्रलंबित थकबाकीसाठी अभय योजना-2022 जाहीर केली आहे. या योजने प्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा आहे. वैधानिक आदेशाप्रमाणे रु. 10 हजारच्या आत असलेले थकबाकीदारांनी कोणतेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. विभागामार्फत कायद्यानुसार त्यांचे वैधानिक आदेशान्वये निर्लेखन करण्यात येणार आहे.

       अधिक माहितीसाठी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahagst.gov.in किंवा स्थानिक वस्तू व सेवाकर कार्यालय, गांधी चौक, लातूर येथे संपर्क साधावा.

 

                                                             0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा