जी.डी.सी.अँड ए च्या परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार
जी.डी.सी.अँड ए च्या
परीक्षा
27 ते 29 मे दरम्यान
होणार
लातूर,दि.24,(जिमाका):-
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य
, पूणे यांचे कार्यालयामार्फत दिनांक 27, 28 व 29 मे 2022 रोजी सकाळी 10.00 ते
1.00 व दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत जी.डी.सी. अँड ए परिक्षा श्री. मारवाडी राजस्थान
विद्यालय, शासकीय रुग्णालयाच्या समोर, सिग्नल कँम्प, लातूर या परिक्षा केंद्रावर घेण्यात
येणार आहेत असे चिफ कंडक्टर जी.डी.सी. अँड ए परीक्षा तथा जिल्हा उपनिबंधक, सहाकारी
संस्था, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या परीक्षा संबंधी सर्व परिक्षार्थिंना सुचित करण्यात येते
की, ज्यांना परिक्षेचे हॉल तिकीट मिळालेले नाहीत अथवा मोबाईलव्दारे संदेश प्राप्त झालेले
नाहीत त्यांनी पॅन कार्ड निवडणूक मतदान ओळखपत्र, ड्रायविंग लायसन्स, व अनुषंगिक ओळखपत्रासहित
जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, लातूर, प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय
परिसर येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दुरध्वरीनी क्र. 02382-245193 असा आहे.
0000
Comments
Post a Comment