समुदाय आरोग्य अधिकारी यांची गुणवृध्दी व गुणगौरव कार्यशाळा संपन्न
समुदाय
आरोग्य अधिकारी यांची
गुणवृध्दी
व गुणगौरव कार्यशाळा संपन्न
*लातूर,दि.10(जिमाका):-*
आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी कार्यक्रमातंर्गत नुकतीच जिल्ह्यातील सर्व आरोग्य वर्धिनी
उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची एक दिवसीय गुणवृध्दी व गुणगौरव कार्यशाळा
प्रशासकीय इमारत येथील डी.पी.डी.सी. हॉल येथे पार पडली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
आयुष्यमान भारत
ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून यात प्रा.आ. उपकेंद्राचे आरोग्य वर्धिनी
केंद्रात रुपांतरण करुन त्यांची ब्रॅन्डींग करुन त्याठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी
यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यात एकुण -201 उपकेंद्र हे आरोग्य वर्धिनी
केंद्रात रुपांतरण करण्यात आलेले आहेत. तसेच एकुण 175 समुदाय आरोग्य अधिकारी यांची
आरोग्य वर्धिंनी उपकेंद्र येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील समुदाय आरोग्य अधिकारी
यांच्याकार्यशाळेत इ.संजीवनी, माता बालसंगोपन, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय
कुष्ठरोग कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार कार्यक्रम, साथरोग आजार कार्यक्रमतसेच राष्ट्रीय
आरोग्य अभियान अंतर्गत् विविध सेवा व योजना यांचा संवादात्मक आढावा घेण्यात आला. उपरोक्त
विविध कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी
अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव
करण्यात आला.
या कार्यशाळेत
मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी समुदाय आरोग्य अधिकारी
यांनी जनतेमध्ये कोणतेही आजार पसरु नयेत याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर देऊन
लोकांचा आरोग्यावरील खर्च होऊ नये यासाठी सर्तक राहुन गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा दयावी
असे आवाहन केले. तसेच डॉ. हनुमंत वडगावे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. लातूर यांनी या
कार्यशाळेचे प्रस्ताविक केले व जनतेस उत्कृष्ठ आरोग्य सेवा कशी मिळवून देता येईल याबाबत समुदाय
आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे,अति.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. फुलारी,एस.एस. साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत
कुलकर्णी, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी तालुका कार्यालय जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
हेंमंत सोळुंके, जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी मंगेश रणदिवे, आरोग्य वर्धिनी
सल्लागार डॉ.सोनाली नागठाणे, आशा समन्यवक श्रीमती संगीता डवरी, डॉ.ऋशीकेश खरोळकर, डॉ.माधुरी
उटीकर, गजानन लाडेकर,बाबु सय्यद, वाघमारे रमेश यांची या कार्यशाळेस उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासन अधिकारी संतोष माने यांनी केले.
0000
Comments
Post a Comment