अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी विहित नमुण्यात शिष्यवृत्ती अर्ज सादर करावेत

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी

विहित नमुण्यात शिष्यवृत्ती अर्ज सादर करावेत

             *लातूर,दि.25,(जिमाका):-* एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद कार्यक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना,बीड व लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे या करिता सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती देणे करीता अर्ज मागविण्यात येत असून पुढील अभ्यासक्रमास परदेशात शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांने अर्ज करावेत असे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

             यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम- पदवी / पदव्युत्तर, बी.टेक (इंजिनिअरींग )- पदवी / पदव्युत्तर, एम.बी.ए.- पदवी / पदव्युत्तर, विज्ञान- पदवी / पदव्युत्तर, कृषि –पदवी / पदव्युत्तर व इतर विषयाचे अभ्यासक्रम- पदवी / पदव्युत्तर चा समावेश आहे.

             उपरोक्त अभ्यासक्रमास परदेशात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राप्त विहीत नमुण्यात अर्ज भरुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महानगरपालिका गाळे तिसरा मजला रिलायन्स मॉलजवळ राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर गजानन महाराज मंदिर रोड, औरंगाबाद यांचे कडे दिनांक 5 जून 2022 पर्यंत सादर करावेत. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 0240- 2486069 आहे. असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु