ग्रामपंचायतीच्या राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावे
ग्रामपंचायतीच्या
राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी
जातीचे
वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावे
*लातूर,दि.11(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील माहे जानेवारी 2021
मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत
राखीव प्रवर्गातुन निवडून आलेल्या
उमेदवारांनी पडताळणी समितीकडून
दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यास
सादर करण्याचा अंतिम दिनांक 17
जानेवारी 2023 असल्याचे
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
ग्रामविकास
विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकान्वये माहे जानेवारी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत राखीव प्रवर्गातुन निवडुन आलेल्या
उमेदवारांनी पडताळणी समितीकडुन दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिका-यास
सादर करण्याचा अंमित दिनांक 17
जानेवारी 2023 असा असल्याचे
पत्रकात नमुद केले आहे.
0000
Comments
Post a Comment