खरीप - 2022 हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना
खरीप - 2022 हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना
*लातूर, दि.17:- (जिमाका ):-* सद्यस्थितीला निर्माण झालेल्या परस्थितीत खत, बियाणे,
कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी तसेच गुणवत्ते संदर्भात तक्रारीचे
निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या नियंत्रण
कक्षामध्ये सकाळी 8-00 ते सायंकाळी 8-00 या वेळेत शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविता
येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीद्वारे
कळविले आहे.
बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व कीटकनाशके
विक्रते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या
अडचणी आल्याचे निर्दशनात येत आहेत. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत
अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे,
खते व कीटकनाशके विक्रते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खते व कीटकनाशक विक्रते
यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळेनिर्माण
झालेल्या खत टंचाईच्या अनुषंगाने निविष्ठा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याचे
विक्री नियंत्रण करणे आवश्यक आहे.
बियाणे, खते व कीटकनाशक यांच्या गुणवत्ता व पाठपुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या
अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर
नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी ८-०० ते सायंकाळी ८-०० या
वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी- ९४०५६५३०४६ असेल. सोबतच अडचण किंवा तक्रार
dsaolatur@rediffmail.com या इ-मेल आयडीवर सुद्धा मेलद्वारे पाठवता / नोंदवता येईल,
असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
*****
Comments
Post a Comment