शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडाप्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश

 

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध

क्रीडाप्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश

                      

*लातूर,दि.10(जिमाका):-* महाराष्ट्र राज्यात राष्‍ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनांच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

               क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्यचाचणी अर्हता पूढीलप्रमाणे आहे. सरळप्रवेश प्रक्रिया :- क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे अशा खेळाडूंना संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्यचाचणी:- क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तर पदक व राष्ट्रीय सहभाग तसेच ज्यांचे वय 19 वर्षाचे आत आहे अशा खेळाडूंची खेळनिहाय कौशल्यचाचणी आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल. अनिवासी प्रवेश प्रक्रिया:- अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. समाविष्ट खेळप्रकार:- आर्चरी, ज्युदो, हॅन्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी,  टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स.

               या चाचण्यांसाठी पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड, क्रीडा प्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर येथे 11 मे 2022 पर्यंत सादर करावेत व लातूर जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे  यांनी केले आहे.

          अधिक माहितीसाठी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर 02308-257071 कृष्णा केंद्रे, क्रीडा अधिकारी-9975576600, सुरेंद्र कराड, क्रीडा मार्गदर्शक-7972397130,जयराज मुंढे-8275273917  या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा