जिल्हा सैनिक कार्यालयातील अशासकीय रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज करावेत

 

जिल्हा सैनिक कार्यालयातील

अशासकीय रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज करावेत

 

 

*लातूर,दि.27 (जिमाका):-* जिल्ह्यातील माजी सैनिक / आजी सैनिक पत्नी / विधवांना तसेच इतर नागरीक यांच्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांचे आस्थापनेवरील सैनिक मुलां / मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह येथे पूढील अशासकीय रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 17 जून 2022 पर्यंत अर्ज या कार्यालयास सादर करण्यात यावेत असे निवासी उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या रिक्त पदामध्ये सहायक वसतिगृह अधिक्षिका-01 प्रतिमाह मानधन रु. 9902/- सहायक वसतिगृह अधिक्षक – 01 प्रतिमाह मानधन रु. 9902/- स्वंयपाकी (महिला) -04 प्रतिमाह मानधन रु. 5941/- चौकीदार (पुरुष-02 व महिला -01)-03 प्रतिमाह मानधन रु. 8911/- सफाई कामगार (पुरुष-01 व महिला-01)-02 प्रतिमाह मानधन रु. 5658/- व माळी-01 प्रमिमाह मानधन रु. 4000/- चा समावेश आहे.

 

 

                                            0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु