जिल्ह्यातील डाळिंब,लिंबू व सीताफळ पिकासाठी विमा योजना लागू

 

जिल्ह्यातील डाळिंब,लिंबू व सीताफळ

  पिकासाठी विमा योजना लागू

 

              *लातूर,दि.31(जिमाका):-* मृग बहार -2022 मध्ये डाळिंब,लिंबू व सीताफळ या पिकासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्हृयामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

              या योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. जिल्हृयामध्ये सदर योजना एच.डी.एफ.सी.अर्गो जनरल इन्शूरन्सं कपंनी मुंबई या विमा कंपनीमार्फत कार्यान्वीत केली जात आहे.

              जिल्ह्यातील अधिसूचित फळपिके व महसूल मंडळ पूढील प्रमाणे आहेत. लातूर तालुका डाळिंब लागू नाही, लिंबू लागू नाही, सिताफळ हरंगुळ बु. औसा तालुका डाळिंब औसा, किनीथोट, लामजना,बेळकुंड, किल्लारी व भादा लिंबू लागू नाही सिताफळ उजनी, निलंगा तालुका येथे  डाळिंब निलंगा, औराद शा. लिंबू लागू नाही, सिताफळ औराद शा., रेणापूर येथे डाळिंब- कारेपूर लिंबू लागू नाही सिताफळ- सर्व महसूल मंडळ, शि.अनंतपाळ येथे डाळिंब लागू नाही, लिंबू लागू नाही, सिताफळ लागू नाही, उदगीर तालुका येथे डाळिंब-नागलगाव, हेर, लिंबू – हेर सिताफळ लागू नाही. अहमदपूर तालुका येथे अहमदपूर,किनगाव, लिंबू लागू नाही, सिताफळ लागू नाही, चाकूर तालुका येथे नळेगाव, वडवळ ना., चाकुर,लिंबू लागू नाही, सिताफळ लागू नाही, जळकोट तालुका येथे डाळिंब लागू नाही, लिंबू लागू नाही, सिताफळ लागू नाही, डाळिंब अंतीम दि.14 जुलै 2022, लिंबू 14 जून 2022 व सिताफळ 31 जूलै 2022, विमा संरक्षीत रक्कम डाळिंब 130000/- लिंबू- 70000/- व सिताफळ- 55000/- शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता- डाळिंब- 6500/- लिंबू- 3500/- व सिताफळ- 4125/- 

          कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सदर योजना ऐच्छिक  असुन कर्जदार शेतक-यांना सदर योजनेत भाग घेणे अथवा घेणे बाबत संबंधित बॅकेकडे विहित नमुन्यात घोषणापत्र अर्ज सदर करावा लागेल अर्ज केला नसल्यास आपली मती आहे असे गृहीत धरुन बॅकेमार्फत आपला विमा हप्ता कपात करण्यात येईल.

      बिगर कर्जदार शेतक-यांनी  विहीत मुदतीत बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. (त्यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधारकार्ड/आधार नोंदणी प्रत, जमिन धारक 7/12, 8() उतारा फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो , भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांच्या करारनामा/सहमती पत्र,आणि बॅक पासबुकाची प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रानिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.

       अधिक माहितीसाठी संबंधित तालूका कृषि अधिकारी किंवा विमा कंपनीचे प्रतिनीधी  अविनाश खेडकर मो.नं.(8888436054) यांचेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  दत्तात्रय्गावसाने यांनी केले आहे.

 

                                                     0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा