मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक यांनी मतदार यादीसबंधी प्रलंबीत कामकाज त्वरीत पुर्ण करावे. अन्यथा सबंधिताविरुध्द नियमानुसार कार्यवाही करणार...! - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे निर्देश
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक यांनी मतदार यादीसबंधी प्रलंबीत कामकाज त्वरीत पुर्ण करावे.
अन्यथा सबंधिताविरुध्द नियमानुसार कार्यवाही करणार...!
-
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे निर्देश
*लातूर, दि.2(जिमाका):-*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार निवडणूक विषयक मतदार यादीतील त्रुटीची कामे मोठया प्रमाणात प्रलंबीत असुन त्यामध्ये DSE (Demography Similar Entries) व PSE (Photo similar Entries) आणि गरुडा ॲप वर प्रलंबीत अर्ज सबंधी कामकाज प्रामुख्याने मोठया प्रमाणात प्रलंबीत असल्याने सदर कामकाज तात्काळ पुर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत.
त्यास अनुसरुन जिल्हाधिकारी, लातूर यांनी 234 लातूर ग्रामिण व 235 लातूर शहर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक यांची दि.30 एप्रिल 2022 रोजी आढावा बैठक घेऊन मतदार यादीतील प्रलंबीत कामकाज सबंधी विचारणा केलेी असता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच DSE (Demography Similar Entries) व PSE (Photo similar Entries) आणि गरुडा ॲप वर प्रलंबीत अर्ज सबंधी कामकाज आठ दिवसात पुर्ण करावे अन्यथा सबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक याचेविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत कार्यवाही करणार असेही उपस्थित सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षकांना यांना सुनावले. तसेच अनुऊपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ व त्यांचे पर्यवेक्षक यांना नोटीस बजावुन खुलासा मागवावे व समाधानकारक खुलासा न आल्यास सबंधीतांवर तात्काळ नियमानुसार कार्यवाही करण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.
यावेळी आढावा बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी
अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय
अधिकारी सुनिल यादव उपविभागीय अधिकारी औसा – रेणापूर, अविनाश कांबळे, तहसिलदार स्वप्नील पवार, नायब तहसिलदार कुलदिप देशमुख यांचेसह
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment