सामाजिक न्‍याय विभागातंर्गत देण्‍यात येणा-या विविध पुरस्‍कारांसाठी 15 मे पर्यंत अर्ज करावेत

 

सामाजिक न्‍याय विभागातंर्गत देण्‍यात येणा-या विविध

पुरस्‍कारांसाठी 15 मे पर्यंत अर्ज करावेत

 

 

*लातूर,दि.5 (जिमाका):-* समाज कल्‍याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्‍वयंसेवी संस्‍था व या क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात येते.  त्‍यानुषंगाने सन 2019-20, 2020-21  व सन 2021-22  या आर्थिक वर्षात देण्‍यात येणा-या पूढील पुरस्‍कारासाठी 15 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्‍यात येत आहेत.  तथापि सन 2019-20  या कालावधीत ज्‍या अर्जदारांनी अर्ज केलेला आहे.  त्‍यांनी त्‍या कालावधीसाठी पुन्‍हा अर्ज करण्‍याची आवश्‍यकता नाही असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्‍याण, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

पुरस्काराचे नाव, पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती) व पुरस्कारसाठी निवडीचे निकष (संस्था) पूढील प्रमाणे आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्‍कार, अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, दिव्‍यांग कल्‍याण क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्याचा 15 वर्षाचा अनुभव, संस्‍थेमध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार नसावा, संस्‍थेचे समाज कल्‍याण क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य आवश्‍यक, मागील 5 वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्‍यक.

 साहित्‍यरत्‍न लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार, मातंग समाजातील कला, साहित्‍य, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत, कलावंत साहित्यिक व समाज सेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात 10 वर्ष कार्य केलेले असावे. व्‍यक्‍ती व संस्‍थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्‍कारास पात्र समजण्‍यात येणार नाही. पुरस्‍कारसाठी फक्‍त मातंग, समाजातील कलावंत व साहित्यिक व समाज सेवक यांचा विचार केला जाईल.

समाज कल्‍याण क्षेत्रात मातंग समाजाच्‍या उन्‍नतीसाठी शिक्षण, आरोग्‍य, अंधश्रध्‍दा निर्मुलन, जनजागृती इत्‍यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्‍था मातंग समाजाच्‍या कल्‍याणासाठी १० वर्षाहून अधिक मौलिक काम असावे. मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात येईल.

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्‍कार, अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांतील भुमिहीन, शेतमजूर, व दुर्बल घटकांच्‍या कल्‍याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्ष कार्य केलेले असावे. एका व्‍यक्‍तीस एकापेक्षा जास्‍त पुरस्‍कारासाठी पात्र समजण्‍यात येणार नाही. हा पुरस्‍कार मिळण्‍यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र, ह्या गोष्‍टींचा विचार केला जाणार नाही. समाज कल्‍याण क्षेत्रात व अनु. जाती व नवबौध्‍द समाजाच्‍या उन्‍नतीसाठी शिक्षण, आरोग्‍य, अन्‍याय निर्मुलन, अंधश्रध्‍दा रुढी निर्मुलन, जनजागृती, भुमिहीन शेतमजूर यांचे कल्‍याण इत्‍यादी क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्‍थांना हा पुरस्‍कार दिला जाईल. समाज कल्‍याण क्षेत्रात 10 वर्ष कार्य असावे.  विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्‍थेच्‍या बाबतीत अट शिथिल करण्‍यात येईल.

संत रविदास पुरस्‍कार, चर्मकार समाजाच्‍या कल्‍याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीतकमी 15 वर्ष कार्य केलेले असावे. एका व्‍यक्‍तीस एकाकपेक्षा जास्‍त पुरस्‍कारासाठी पात्र समजण्‍यात येणार नाही. लोकनियुक्‍त प्रतिनिधी पुरस्‍कारासाठी पात्र राहणार नाही. समाज कल्‍याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्‍या उन्‍नतीसाठी शिक्षण, आरोग्‍य, अन्‍याय निर्मुलन, अंधश्रध्‍दा रुढी निर्मुलन, जनजागृती इत्‍यादी क्षेत्रात कार्य करणा-या सामाजि संस्‍थाना हा पुरस्‍कार दिला जाईल. समाज कल्‍याण क्षेत्रात १० वर्ष कार्य असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्‍थेच्‍या बाबतीत अट शिथिल करण्‍यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्‍कार, साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे पुरस्‍कार, पद्मरी कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्‍कार, संत रविदास पुरस्‍कारासाठी  व्‍यक्‍तींकरीता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्ष आणिक महिलांसाठी ४० वर्ष आहे, या पुरस्‍कारासाठी संस्‍थांच्‍या बाबतीत-  या संस्‍था मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त अधिनियम १९५० व संस्‍था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्‍यात, आणि या संस्‍था राजकारणापासुन अलिप्‍त असाव्‍यात.

·        वरील सर्व पुरस्‍कारांसाठी शिफारशीच्‍या पध्‍दती पुढील प्रमाणे आहेत.

व्‍यक्‍तीचे संपुर्ण जिवनचरित्र, विनादुराचार प्रमाणपत्र, गैर वर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्‍याचे प्रमाणपत्र,  सार्वजनिक संपत्‍तीचा अपहार केला नसल्‍याचे प्रमाणपत्र  उ) संस्‍था व व्‍यक्‍ती यांनी केलेल्‍या विशेष कार्याचा तपशील.

पुरस्काराचे नाव तसेच पुरस्कारसाठी निवडीचे निकष (संस्था) पूढील प्रमाणे आहेत. शाहु फुले आंबेडकर पारितोषिक, राज्‍य शासनाच्‍या Rules of Business अनुसार हा विभाग कार्यरत असता पाहिजे. संस्‍थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्‍यक्‍ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्‍य, पुनर्वसन, रोजगार अशा व यांसारख्‍या व्‍यक्तिगत व सामुहिक क्षेत्रामध्‍ये एकमेव अव्दितीय कार्य केलेले असले पाहिजे. सदर संस्‍था संबंधित क्षेत्रात किमान मागील १० वर्षापासून कार्यरत असणे आवश्‍यक आहे. संबंधित संस्‍था ही मुंबई विश्‍वस्‍त नोंदणी अधिनियम १९५० व संस्‍था नोंदणी अधिनिय १८६० अन्‍वये नोंदणीकृत असावी. संस्‍थेची आर्थिक स्थिती बळकट असली पाहिजे. संबंधीत संस्‍थेविरुध्‍द किंवा पदाधिका-यांविरुध्‍द फौजदारी गुन्‍हा किंवा दंडात्‍मक कार्यवाही झालेली नसावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय प्रविण्‍य पुरस्‍कार, अनुसूचित जातीच्‍या मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृहे, अनुसूचित जातीच्‍या मुलांमुलींसाठी निवासी शाळा/आश्रमशाळा  अनुसूचित जातीच्‍या मुलांमुलींसाठी अनुदानित वसतिगृहे,प्रत्‍येक स्‍तरावर समितीने दिलेला निर्ण हा अंतिम राहील. संस्‍थांची तपासणी करुन समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्‍यात येईल. पुरस्‍कारासाठी अंतिम निवडीच्‍या वेळी जर दोन्‍ही संस्‍थांना समान गुण मिळाल्‍यास चिठ्ठी पध्‍दतीने संस्‍थेची निवड करण्‍यात येईल. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी संस्‍था ५ वर्षे कालावधीपर्यंत पुन्‍हा  पुरस्‍कारासाठी पात्र असणार नाही. ज्‍या संस्‍थेविरुध्‍द फौजदारी गुन्‍हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले असेल अशा संस्‍था पुरस्‍कारासाठी पात्र राहणार नाहीत. कोणतीही संस्‍था एकाच वेळी दोन पारितोषिके मिळविण्‍यास पात्र असणार नाही.

 जिल्ह्यातील इच्छूक संस्था व व्यक्ती यांनी सदरहू पुरस्कार संदर्भात संबंधीत जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्‍याण  कार्यालयाकडे दिनांक  15 मे 2022 पर्यंत अर्ज करावा. असे आवाहन सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण शिवकांत चिकुर्ते  यांनी केले आहे. विहीत नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्याकडे  उपलब्ध आहे.  अधिक माहितीसाठी या कार्यालयातील समाज कल्‍याण निरिक्षक संदेश घुगे (९४०५४४६२१६)  व या कार्यालयातील कनिष्‍ठ लिपीक  शिवाजी पांढरे (९८२३७६८१८८) यांच्‍याशी संपर्क साधावा.

 

                                                             000

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा