ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत अधिसुचना जारी
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक
वापराबाबत अधिसुचना जारी
लातूर,दि.24,(जिमाका):-
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत
श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर
ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 06 वाजल्यापासून
ते 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य
शासनाव्दारे प्राधिकृत केले आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना प्रदान
असलेल्या अधिकाराचा वापर करुन ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000च्या नियम
5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे,
सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या
निकडीनुसार सन 2022 करिता पूढील 15 दिवस फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी
06 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल अशी अधिसुचना जारी केली आहे.
सण / उत्सव व दिवस पूढील प्रमाणे राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती -01 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- 01 दिवस, 01 मे
महाराष्ट्र दिन - 01 दिवस, श्रीगणेश उत्सव- 04 दिवस (पाचवा गौरी विसर्जन), सातवा, अनंत
चतुर्दशीचा आदला दिवस व अनंत चतुर्दशी ), नवरात्री उत्सव- 02 दिवस (अष्टमी व नवमी),
दिवाळी-01 दिवस (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद- 01 दिवस, ख्रिसमस-01 दिवस, 31 डिसेंबर-01
दिवस व उर्वरित 02 दिवस- दिवाळी पाडवा व रमजान ईद राहील.
वर नमूद सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक
वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी
करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त / स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी
प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील.
ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांनी
ध्वनी प्रदुषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर उच्च न्यायालयाने दिनांक 16 ऑगस्ट
2016 रोजी दिलेल्या आदेशात विहित पध्दतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल
सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच या कार्यालयास सादर करावा असे ही प्रसिध्दी पत्रकात
नमुद केले आहे.
Comments
Post a Comment