जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरीकांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा

 

जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व

विशेष मागास प्रवर्गातील नागरीकांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा

 

   *लातूर,दि.11(जिमाका):-*जिल्ह्यात वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.),लातूर कार्यालयामार्फत विमुक्त जाती,भटक्या जमाती  व विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरीता, पूढील प्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस.पी.काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

     वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-१) योजना:- या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा रु.10.00 लाखापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती,भटक्या जमाती  व विशेष मागास प्रवर्गातील असावा,अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे,अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.सदर योजना ही ऑनलाईन असून याकरिता आधारकार्ड, रहिवाशी दाखला,उत्पन्नाचे प्रमाणपत्र,जातीचा दाखला,शाळेचा दाखला संबंधित व्यवसायाचे कोटेशन,प्रकल्प अहवाल WWW.VJNT.IN  या वेबसाईटवर मूळ कागदपत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.या योजनेकरिता सन-2022-23 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यालयाकडून 100 उदिष्ट प्राप्त झाले आहेत.

      गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-२) योजना:- या योजनेकरिता कर्जाची मर्यादा रु.10.00 लाख ते रु.50.00 लाखापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा,गटातील सदस्य हे विमुक्त जाती,भटक्या जमाती  व विशेष मागास प्रवर्गातील असावा,गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्ष पर्यंत असावे,गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्याचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा.उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादित असावी सदर योजना या ऑनलाईन योजना असून या करिता सदस्याचे जातीचा दाखला,उपन्नाचा दाखला ,रहिवाशी,आधारकार्ड,शाळेचा दाखला,संबंधित व्यवसायाचे कोटेशन,प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे WWW.VJNT.IN  या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.या योजनेकरिता सन-2022-23 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यालयाकडून 02 उदिष्ट प्राप्त झाले आहेत.

      रु.1.00 लाख थेट कर्ज योजना:- या योजनेमध्ये महामंडळाकडून रु.1.00 लाख थेट कर्ज दिले जाते. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत व बोझा नोंद करून देणे महत्वाचे असून या करिता जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला (1.00 लाखापर्यंत मर्यादा) रेशन कार्ड,आधारकार्ड,रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे या योजनेचे फॉर्म महामंडळातून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रीतसर नोंद करून अर्जदारास मिळेल. या योजनेकरिता सन-2022-23 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यालयाकडून 200 उदिष्ट प्राप्त झाले आहेत.

     25% बीज भांडवल योजना:- ही योजना बँकेमार्फत राबविली जात असून अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,रेशन कार्ड, रहिवाशी दाखला, आधारकार्ड, व्यवसायानुसार कागदपत्रे  ई. जोडून कार्यालयास दोन प्रती मध्ये अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यापूर्वी  लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. या योजनेकरिता सन-2022-23 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यालयाकडून 100 उदिष्ट प्राप्त झाले आहेत.

      जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी कर्ज अर्ज करण्याकरिता व आधिक महितीसाठी  जिल्हा कार्यालय - वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, शिवनेरी गेट समोर,गूळ मार्केट,लातूर. दूरध्वनी क्रं.02382-299607 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती.एस.पी.काळे यांनी केले आहे.

                                   000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा