जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या विलंबामुळे 1 हजार 243 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित* महाविद्यालयांना 25 मे पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम

 

*जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या विलंबामुळे 1 हजार 243 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित*

 

*महाविद्यालयांना 25 मे पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत*

 

 

*लातूर, दि.17:- (जिमाका ):-* जिल्ह्यातील 21 महाविद्यालयातील 1 हजार 243  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्जच सादर न केल्याने शिष्यवृत्ती थांबली आहे. वारंवार सुचना करुनही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. परिणामी 25 मे,  2022 पर्यंत अंतिम मुदत समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. महाविद्यालयीन इतर मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे. काही महाविद्यालयांनी अर्ज सादर करुनही इतर मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती अद्याप खात्यात जमा झाली नाही, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या व दहा पेक्षा कमी अर्ज सादर केलेल्या महाविद्यालयांची नावे पुढील प्रमाणे आहेत. शारदा नर्सिंग स्कूल, लातूर -154, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, उदगीर -72, डी.बी. इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च कॉलेज महारंग्रा -64, एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा -53, राजीव गांधी आरजीएनएम नर्सिंग स्कूल उदगीर -43, श्री भगवान नर्सिंग स्कूल लातूर -28, पुष्पाई नर्सिंग स्कूल अहमदपूर-20 , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर -20, महात्मा फुले बी.एड. व एम. एड. जळकोट-20, कै. महालिंगस्वामी नर्सिंग स्कूल लातूर -20, बालाघाट पॉलिटेक्नीक रुध्दा -15, ग्रामीण प्रायव्हेट आय.टी.आय. घरणी -15, सरोजनी नायडू नर्सिंग स्कूल चाकूर -15, जिजामाता नर्सिंग स्कूल लातूर -14, धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर -14 , माऊली कॉलेज बी. फार्मसी तोंडार-14, चन्नाबसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूर -13, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर 12, विवेक वर्धिनी कॉलेज देवणी -10 , श्री व्ही.डी.  देशमुख एम.सी.ए. कोळपा -10, भिवराई नर्सिंग स्कूल लातूर 10 विद्यार्थी .

महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास  त्याची सर्वस्वी आर्थिक जबाबदारी प्राचार्य यांची राहील. यासंदर्भाने भविष्यात शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काबाबत सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार नाही, याची सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असे अंतिम अवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज संख्या तात्काळ निकाली काढवी अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी प्रणालीवरील महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ  निकाली काढण्याबाबत समाज कल्याण विभागाकडून संबंधित महाविद्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहूजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व शिेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेतंर्गत महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यंना ऑनलाईन केलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर पाठविले जातात. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जाची तपासणी करुन शिष्यवृत्तीकरिता पात्र अर्ज समाज कल्याण विभागाला पाठविणे आवश्यक आहे , तर त्रुटींचे असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीन परत करणे आवश्यक आहे. परंतु वारंवार सुचना देवूनही जिल्ह्यातील 1 हजार 243 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तपासणी करुन पात्र अर्ज हे सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, लातूर यांच्या लॉगीनवर दिनांक 25 मे, 2022 पर्यंत पाठवावयाचे आहे. व त्रुटी असलेल्या अर्जांची पुर्तता करण्याचा अंतिम मुदत समाज कल्याण विभागाने दिला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्यास नियमानुसार कार्यवाही करण्याचा इशाराही समाज कल्याण विभागाने दिला आहे.   

 

****  

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु