महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा लातूर जिल्हा दौरा
महाराष्ट्र विधानमंडळ
विमुक्त जाती व भटक्या जमाती
कल्याण समितीचा
लातूर जिल्हा दौरा
*लातूर,दि.31(जिमाका):-*दि. 1 जून 2022
ते 3 जून 2022 या कालावधीमध्ये श्री. शांताराम मोरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र
विधान मंडळ विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीचा लातूर जिल्हा अभ्यास दौरा आयोजित
केलेला आहे.
या महाराष्ट्र विधान मंडळ विमुक्त जाती
भटक्या जमाती कल्याण समितीच्या दौऱ्या दरम्यान प्रशासकीय विभागामधील विमुक्त जाती भटक्या
जमाती प्रवर्गाच्या कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबीचा आढावा घेणार आहेत. तसेच
विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या प्रवर्गाकरीता राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत
आढावा घेणार आहेत.
जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती
प्रवर्गाकरीता राबविण्यात आलेल्या योजनांच्या ठिकाणास या वेळी प्रत्यक्ष भेट देणार
असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment