महाराष्ट्र दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या

योजनांचा जागर कार्यक्रम

         

              


*लातूर, दि.2(जिमाका):-*दि. 01 मे, 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर साजरा होणा-या महाराष्ट्र दिनादिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी व त्याची व्याप्ती वाढावी, यासाठी मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी  योजनांचे स्टॉल लावून योजनेची प्रसिध्दी , प्रचार  करणे यासाठी योजनाचा जागर कार्यक्रम घेणे बाबत दि. 21 एप्रिल, 2022 च्या शासन निर्णयान्वये निर्देश दिलेले होते.

त्याअनुषंगाने दि. 1 मे 2022 रोजी जिल्हा क्रिडा संकुल, लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री, तसेच महापौर विक्रम गोजमगुंडे,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे लावण्यात आलेल्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.


तद्नंतर पालकमंत्री अमित देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंट या पुस्तिकेचे व जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांनी तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती पुस्तिका या दोन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

 तसेच सदर स्टॉलच्या ठिकाणी समाज कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आयुक्तालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी), विभागंतर्गत कार्यरत महामंडळे या सर्व कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे माहितीपत्रके / माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर स्टॉलला भेट देणा-या व्यक्तिंना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु