लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत -पालकमंत्री अमित देशमुख

 

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे

तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत

                                                        -पालकमंत्री अमित देशमुख

·         पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर, निलंग्याच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी केली पाहणी 

          लातूर,दि.19 (जिमाका):- लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व परिसरात परवा सायंकाळी अवकाळी वादळी पाऊस होऊन फळबागा भाजीपाला या शेती पिकांचे तसेच घरे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन आपदग्रस्तांना मदत करावी दिलासा द्यावा व नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

         मंगळवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसासंदर्भात माहिती मिळताच पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

           औरादशहाजानी, हालसी, तगरखेडा, तसेच  जिल्ह्यात इतर काही ठिकाणी अवकाळी वादळी वारे व पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आंबा तसेच इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले  आहे, विजेचे खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून मालमत्तेचे नुकसान झाल्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली असून जिल्ह्यात आणखी कुठे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या संबंधी माहिती येऊन जिल्हा





प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदत पथके पाठवावीत, आपदग्रस्तांना मदत करावी व दिलासा द्यावा. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी असेही निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहे दिले आहेत.

त्यानुसार निलंग्याच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी या भागाची पाहणी केली.


****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा