हरभरा (चना) खरेदी कालावधीसाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ
हरभरा
(चना) खरेदी कालावधीसाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ
*लातूर,दि.31(जिमाका):-*राज्यात हमीभावाने
हरभरा (चना) खरेदीसाठी केंद्र शासनाने दि. 17 फेब्रुवारी 2022 च्या पत्रान्वये एकूण
6,89,215 मे.टन उदिष्ट निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने दि. 1 मार्च 2022 पासून प्रत्यक्ष
खरेदी सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत दिनांक 29 मे 2022 पर्यंत एकूण शेतकऱ्यांकडून
67,13,535.45 क्विंटल हरभरा (चना) खरेदी करण्यात आला आहे.
राज्यात 32.83 लाख मे.टन अपेक्षित उत्पादनाच्या
आधारे दि. 30 मे 2022 च्या पत्रान्वये केंद्र शासनाने 7,76,460 मे.टन सुधारित उद्दीष्ट
निश्चित केले असून खरेदीचा कालावधी दि. 18 जून 2022 पर्यंत वाढविण्यात आला असल्याचे
सह सचिव (पणन) , महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
त्यानुसार या पूर्वी निश्चित केलेल्या
उत्पादकतेप्रमाणे शेतकऱ्यांकडून हरभरा (चना) खरेदी करण्यात यावा या बाबत सर्व क्षेत्रिय
यंत्रणांना कळविण्यात आले आहे. तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या हरभरा (चना) खरेदी
कालावधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment