डाक अधिक्षक उस्मानाबाद मुख्यालय लातूर कार्यालयात 8 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
डाक अधिक्षक उस्मानाबाद मुख्यालय लातूर कार्यालयात
8 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
*लातूर,दि.27 (जिमाका):-*डाकघर अधिक्षक
उस्मानाबाद मुख्यालय, लातूर- 413512 मार्फत दिनांक 8 जून 2022 रोजी 11.00 वाजता
डाकघर अधिक्षक उस्मानाबाद मुख्यालय लातूर यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन
करण्यात आले असल्याचे डाकघर अधिक्षक उस्मानाबाद मुख्यालय, लातूर यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
देशातील पोस्टल सेवा
ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या
मनामध्ये डाकघरच्या सेवेने एक वेगळया प्रकारचे स्थान निर्माणकरुन प्रभावित केले
आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत
जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषणामध्ये / पत्र
व्यवहारमध्ये किंवा सेवेमध्ये काही त्रुटिमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की
त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते या तक्रारीचा योग्य
प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे
ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
उस्मानाबाद क्षेत्र
संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवडयाच्या आत झालेले नसेल व
समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची या डाक अदालत मध्ये दाखल घेतली
जाईल.विशेषत: टपाल वस्तु / मनिऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादि बाबत
तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा.
तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा असावा.
संबंधितांनी डाक
सेवे बाबतची आपली तक्रार सहायक डाकघर अधिक्षक, (एचक्यू) श्याम गायकवाड c/o डाकघर
अधिक्षक उस्मानाबाद मुख्यालय] लातूर- 413512 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 4 जून
2022 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची
दखल घेतली जाणार नाही.
0000
Comments
Post a Comment