केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य!
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य! लातूर, दि. 28 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेमार्फत इतर मागास वर्ग , विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी ‘महाज्योती’तर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय , भटक्या जाती , विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा 15 जून 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी इतर संस्था किंवा ‘सारथी...