जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ‘महाज्योती’मार्फत मुदतवाढ

 

जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी

अर्ज करण्यास ‘महाज्योती’मार्फत मुदतवाढ

लातूर, दि. 28 (जिमाका): महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण इयत्ता दहावीनंतर देण्यात येते. हे प्रशिक्षण दोन वर्षांसाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज सहा जीबी डेटा देण्यात येतो. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना ‘महाज्योती’च्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ दिला जातो. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ‘महाज्योती’ने 5 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

या  योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती ‘महाज्योती’च्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

 

तसेच ज्या उमेदवारांनी यापूर्वी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत. मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहनही ‘महाज्योती’मार्फत करण्यात आलेले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु