साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी २० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी २० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

*लातूर,दि.17(जिमाका):  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील मांग, मातंग महाशी, मदारी, राधे मांग, गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादगी, मादिगा या १२ पोट जातीतील सन २०२२-२३ मधील शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रीकी उत्तीर्ण विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी सन २०२३ -२०२४ मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी ना गुणानुक्रमे प्रथम  ०३ ते ०५ विदयार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती सन २०२३ मध्ये दिली जाणार आहे.

तरी पात्र उमेदवारांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डाल्डा फॅक्टरी शिवनेरी गेट समोर, लातूर येथे खालील कागदपत्रासह दि.२० जुलै, २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा व्यवस्थापक, लातूर यांनी कळविले आहे.

आवश्यक कागदपत्राचा तपशिल

अर्ज करतांना अर्जासोबत जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मागील वर्षाचे (सन २०२२) गुणपत्रीकेची छायांकित प्रत, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दोन पासपोर्ट छायाचित्रे (फोटो) आवश्यक आहेत.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु