शेतकऱ्यांनो, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा !
·
कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
·
पेरणीसाठी 80 ते 100 मिलीलीटर पाऊस आवश्यक
लातूर, दि. 06 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा
पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
यांनी केले आहे.
कृषि विद्यापिठाने किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी शिफारस केलेली आहे. किमान 80 - 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. त्यामुळे खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पावसाच्या खंड काळात पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment