शहीद सुभेदार प्रमोद सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द
जम्मू काश्मीर येथे गुरेज सेक्टरमध्ये कर्तव्य बजावीत असताना सुभेदार प्रमोद सूर्यवंशी शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनामार्फत 50 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाख रुपये अशी एकरकमी 1 कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार : जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या
समस्या, विविध विभागाकडील प्रलंबित अर्ज याविषयीची माहिती जाणून घेवून त्याचा
निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष
शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढेही
सातत्याने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या
समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. यांनी सांगितले.
Comments
Post a Comment