केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य!

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी

पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य!

लातूर, दि. 28 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी ‘महाज्योती’तर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा 15 जून 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी इतर संस्था किंवा ‘सारथी’ कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना या योजनाच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.

 

अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रासह ‘महाज्योती’च्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2023 आहे. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास ‘महाज्योती’च्या कॉल सेंटरवर 0712-2870120/21 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अर्थसहाय्याची रक्कम 15 हजारांवरून 50 हजार रुपये

या आधी केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना 15 हजार रुपये देण्याचे प्रावधान होते. ते आता 50 हजार रुपये करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सवे यांचे आभार मानले आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा