आषाढी वारी-2023 करिता मानाच्या पालख्या, वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत

 

आषाढी वारी-2023 करिता मानाच्या पालख्या,

वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत

 

लातूर दि. 16 (जिमाका):  आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या व जाणाऱ्या दहा मानाच्या पालख्या, तसेच 13 जून ते 3 जुलै 2023 या कालावधीत ज्या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी प्रवेशपत्र देण्यासाठी लातूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात 13 जून ते 3 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत स्वतंत्र कक्ष सुरु राहणार असल्यची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी दिली.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी टोल नाक्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या जड व हलक्या वाहनधारकांनी पथकर सूट मिळविण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पथकर सवलत प्रवेशपत्र (टोल फ्री पास) प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन श्री. भोये यांनी केले आहे.

 

                                                                            *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु