मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
लातूर, दि. 19 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या अंतर्गत 1 जून 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 प्रसिद्धी होणार आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. नुकत्याच झालेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल, अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदविता येणार आहे.
आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्यासाठी https://ceoelection.
लातूर जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास त्यांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरून देवून व आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment