भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्जासाठी

30 जूनपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि.17 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी सन 2016-17 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येत आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज आनलाईन पध्दतीने दि.16 मार्च, 2023 रोजीपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून स्विकारण्यात आलेले आहेत. तथापि, विविध संघटना, पालक , विद्यार्थी यांनी स्वाधार योजनेचे सन 2022-23 मधील अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ मिळणे बाबत आयुक्तालयास विनंती केली असून सन 2022-23 या कालावधीतील अर्ज  दि. 30 जून, 2023 रोजीपर्यंत स्विकारण्यात यावे असे आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी निर्देश दिलेले आहेत.

त्यामुळे सन 2022-23 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज करता आलेला नाही त्यांनी त्वरीत http:// syl.mahasamajkalyan.in याऑनलाईन संकेतस्थळावरदिनांक दि.30 जून, 2023 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून अर्जाची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त कार्यालयास दि.  30 जून,2023 पर्यंत सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु