बाल कामगार प्रथेविरुध्द जिल्ह्यात राबविणार जनजागृती अभियान

 

 लातूर, दि. 09 (जिमाका) : राज्यातून बाल मजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करून बाल मजुरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाल मजुरी विरोधी दिनी, 12 जून रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास बाल कामगारांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करणे आणि बाल मजुरांची मालकांच्या तावडीतुन मुक्तता करणे हा अभियानाचा उद्देश आहे.

 

सन 1986 च्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे, तसेच 14 वर्षे पूर्ण परंतु 18 वर्षे पुर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास होवू शकतो किंवा 20 हजार रुपये ते 50 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक यांनी बाल कामगार कामावर ठेवू नयेत. तसेच बाल कामगार आढळून आल्यास नागरिकांनी कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे सहायक कामगार आयुक्त मं. रा. झोले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा