सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह , लातूर येथील प्रवेशाबाबत आवाहन

 

सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह , लातूर येथील प्रवेशाबाबत आवाहन

 

लातूर, दि.17 (जिमाका): लातूर येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध असलेले स्वच्छ, सुंदर व कमी  दरामध्ये  माजी सैनिकांच्या मुलां / मुलींच्यासाठी वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात लातूर येथे सन  2023-2024 मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी व आजी सैनिकांच्या तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या मुलां / मुलींना पहिल्या टप्यात प्रवेश दिला जाईल. तसेच खाजगी शिकवणीचे वर्ग जे की पूर्ण शैक्षणिक वर्ष चालू असणारे व कमीत - कमी  दररोज सहा  तासपेक्षा जास्त  शिकवणी घेत असलेल्या बोनाफाईडधारक माजी सैनिक / आजी सैनिक तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना दुसरा टप्यात प्रवेश देण्यात येईल. तसेच सदर प्रवेश प्रक्रियेत जागा पूर्ण भरल्या नसल्यास उर्वरित जागेसाठी मा.संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या परवानगीने नागरी मुलां / मुलींना तिसरा टप्यात वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल.

तरी सन 2023 - 2024 करिता प्रवेश घेण्यास  इच्छूक असणाऱ्या मुलां / मुलींसाठी दिनांक 19 जून, 2023 पासून प्रवेश पुस्तिका वाटप सुरू करण्यात येणार आहेत. तरी सर्व माजी सैनिक / आजी सैनिक तसेच युध्द विधवा माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे(नि.) लातूर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

उत्तम भोजन व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय, अभ्यास व वाचनालयाची सोय, मनोरंजन व्यवस्था, खेळासाठी प्रशस्त मैदान , गरम पाण्याची सोय,  सी. एस.डी. कॅन्टीन व ECHS ची सुविधा , सुरक्षेची योग्य सोय, 24 तास लाईट व पाण्याची सोय, शिस्तबंध व प्रसन्न वातावरण, सकाळचा व्यायाम (PT) या वसतिगृहात खालील नमुद केलेल्या सुविधा उपलब्ध आहेत. 

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून भोजन व निवास भाडे नविन दर प्रतिमहा खालीलप्रमाणे ठरविण्यात आले आहेत:-

सेवारत सैनिक अधिकारी यांच्या निवासाठी 1 हजार 500,  जे.सी.ओ. यांच्यासाठी 1 हजार, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी रुपये 800 निवास भाडे दर प्रतिमहा ठरविण्यात आलेला आहे. सेवारत सैनिक अधिकारी यांच्या भोजनासाठी 2 हजार, जे.सी.ओ. यांच्यासाठी 2 हजार, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी 2 हजार निवास भाडे दर प्रतिमहा ठरविण्यात आलेला आहे. सेवारत सैनिक अधिकारी यांच्या निवास व भोजनासाठी एकूण 3 हजार 500 , जे.सी.ओ.साठी 3 हजार रुपये, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी 2 हजार 800 भोजन व निवास भाडे नविन दर प्रतिमहा दर ठरविण्यात आलेले आहेत.

माजी सैनिक अधिकारी यांच्या निवासाठी 1 हजार,  जे.सी.ओ. यांच्यासाठी 800, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी 500 निवास भाडे दर प्रतिमहा ठरविण्यात आलेला आहे. माजी सैनिक अधिकारी यांच्या भोजनासाठी 2 हजार, जे.सी.ओ. यांच्यासाठी 2 हजार, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी 2 हजार निवास भाडे दर प्रतिमहा ठरविण्यात आलेला आहे. सेवारत सैनिक अधिकारी यांच्या निवास व भोजनासाठी एकूण 3 हजार, जे.सी.ओ.साठी 2 हजार 800, शिपाई / एनसीओ यांच्यासाठी 2 हजार 500 भोजन व निवास भाडे नविन दर प्रतिमहा दर ठरविण्यात आलेले आहेत.

सिव्हीलीयन यांच्यासाठी निवासासाठी 1 हजार 500, भोजनसाठी 2 हजार असे एकूण 3 हजार 500 भोजन व निवास भाडे नविन दर प्रतिमहा ठरविण्यात आले आहेत

युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या सर्व पाल्यांना राहण्याची / भोजन  व्यवस्था निशुल्क आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया ही वसतिगृह प्रवेश पुस्तिकेतील नियम व अटीप्रमाणे नमूद प्राधान्यक्रमाने प्रवेश निश्चित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक / अधिक्षिका, सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह, अंबाजोगाई रोड, मेडीकल कॉजेलसमोर, सैनिक संकुल, लातूर येथे तर कार्यालीयन टेलीफोन क्रमांक - 02382-228544 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु