सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

 सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन


लातूर, दि. 22 (जिमाका) : येथील मुला-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठा करण्यासाठी कमीत कमी सहा महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक बंद पॉकेटमध्ये 28 जून 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली अंबाजोगाई रोडवरील सैनिक संकुलात सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह कार्यरत आहे. याठिकाणी 100 विद्यार्थ्यांसाठी दरमहा धान्य खरेदी करण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील धान्य विक्रेता, व्यापारी यांनी 1 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीसाठी सर्व धान्यांचे कमीत कमी सहा महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांच्या नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 28 जून 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन श्री. पांढरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा