दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

                                   दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 19 (जिमाका): केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करिता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह कामकाज मंत्रालयाच्या www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर 15 जून 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील.

राष्‍ट्रीय पुरस्‍कार सन 2023 साठी अर्ज, नामांकने करताना पोर्टलवर उपलब्‍ध असलेल्‍या विशिष्‍ट नमुन्‍यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्‍तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोष्‍टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्‍तर तपशील www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु