डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. झाकीर हुसेन
मदरसा आधुनिकीकरण योजना,
30 जून पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन
लातूर,दि.17(जिमाका):-
राज्यातील नोंदणीकृत मदरसांना आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा
अधुनिकीकरण योजना सन 2023-24 मध्ये शासन निर्णय दि.11 ऑक्टोबर 2013 अन्वये कार्यन्वित
करण्यात आली आहे. सदर योजना सन 2023-24 मध्ये राबविण्याबाबत दि. 31 मे 2023 पत्रान्वये
कळविण्यात आले होते.
तथापी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण या नियमीतपणे राबविल्या
जाणाऱ्या योजनेअंर्गत संस्था चालकांनी / मदरसा चालकांनी प्रस्ताव दि. 11 ऑक्टोबर,
2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन
अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात दि. 30 जून,
2023 दुपारी 5.00 वाजे पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले
आहे. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात
घेतले जाणार नाहीत असे जिल्हा नियोजन अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment