सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणीसाठी 5 जूनपासून वेतन पडताळणी पथकाचा लातूर दौरा

 

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणीसाठी

5 जूनपासून वेतन पडताळणी पथकाचा लातूर दौरा

लातूर, दि. 01 (जिमाका): सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन पडताळणीसाठी औरंगाबाद विभाग लेख व कोषागारे सहसंचालक कार्यालयाचे वेतन पडताळणी पथक 5 जून ते 7 जून 2023 या कालावधीत लातूर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याच्या ठिकाणी जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले व डिसेंबर 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणारे, अधिकारी व कर्मचारी आणि न्यायालयीन, मयत, लोकायुक्त प्रकरणे यांच्या सेवापुस्तकास प्राधान्य दिले जाणार आहे.

सेवापुस्तक वित्त विभागाच्या 20 जानेवारी 2001 रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्राप्रमाणे (चेकलिस्ट) परिपूर्ण पूर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना वित्त विभागाच्या 14 मे 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनिकाप्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावीत. सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबद्ध अथवा आप्रयोच्या लाभ दिलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मूळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे, असे औरंगाबाद विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा