तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु

 इयत्ता दहावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

 लातूर, दि. 07 (जिमाका) : उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सहावीमध्ये 40 जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरु झाली आहे.

सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाच्या तोंडारपाटी येथील शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावीमध्ये अनुसूचित जातीसाठी 80 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 10 टक्के, विमुक्त जाती व जमाती 5 टक्के, दिव्यांग प्रवर्गासाठी 2 टक्के जागा राखीव आहेत. शाळेस आयएसओ नामांकन मिळवणारी लातूर सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दुसरी शाळा आहे. तसेच या शाळेत महाराष्ट्र शासन व कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिडीयट परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यात येते.

प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एक वेळ नाश्ता, दूध, अंडी, केळी, सफरचंद इत्यादी दिले जाते. तसेच दोन वेळा पोटभर व रुचकर जेवण देण्यात येते. तसेच 2 गणवेश, आवश्यक शैक्षणिक साहित्य, दैनंदिन वापरवायचे साहित्य (साबण, सोडा, तेल, पेस्ट, ब्रश इ.) देण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कॉट, गादी, उशी, बेडशीट, कंबल व पेटी देण्यात येते. निवासी शाळेमध्ये दोन हजारपेक्षा जास्त संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालय, ई- लायब्ररी, तसेच दररोज वृत्तपत्रे वाचनासाठी दिली जातात.

शासकीय निवासी शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल वर्गाखोल्या, संगणक प्रयोगशाळा पिण्यासाठी आरओ पाणी, 24 तास सुरक्षा रक्षक, 24 तास वीज पुरवठा व्यवस्था, इनडोअर सुसज्जा जीम, आऊटडोअर जीम, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी या शाळेत प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत नोंदणी करून प्रवेश घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा