समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून तपघाले कुटुंबियांचे सांत्वन
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून
तपघाले कुटुंबियांचे सांत्वन
*लातूर, दि. 22 (जिमाका):* समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी रेणापूर दिवंगत गिरधर तपघाले यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. पिडीत कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेवून त्यांना धीर दिला.
समाज कल्याण आयुक्तालयातील नागरी हक्क
संरक्षण विभागाचे अधीक्षक अनिल लोंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, समाज
कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, पोलीस
कॉन्स्टेबल ए. आर. थोरात, समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे आदी यावेळी उपस्थित
होते.
पिडीत कुटुंबाला शासनाच्या विविध
योजनांचा लाभ देण्याबाबतच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी समाज कल्याण प्रादेशिक
उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिल्या.
*****
Comments
Post a Comment