सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन

 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी

लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन

‘जागेवर निवड संधी उपक्रमाचे आयोजन

लातूर,दि.13 (जिमाका): नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधीचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 14 जून 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.

लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी  ‘जागेवरच निवड संधी उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या नोकरभरतीची गरज असलेल्या उमेदवारांना थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी दिनांक 14 जून, 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल मध्ये जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर, येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम/बायोडाटा/पासपोर्ट फोटो सह उपस्थित रहावे. व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकनी लाभ घ्यावा. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.

अधिक माहिती करीता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांका वर संपर्क साधावा.

                                 ***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु